baba.
baba. 
देश

बाबा का ढाबा प्रकरण; यूट्यूबर गौरव वासवानविरोधात खटला दाखल

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- दक्षिण दिल्लीच्या मालवीय नगरातील 'बाबा का ढाबा'चे  मालक कांता प्रसाद मागील काही दिवसांत खूपच प्रसिध्द झाले होते. यूट्यूबर गौरव वासवानने कांता प्रसाद यांचा एक व्हिडिओ केला होता. त्यानंतर कांता यांच्याकडे मदतीचा ओघ सुरु झाला. पण त्यानंतर पैशांची अफरातफर केल्याचा आरोप करत कांता प्रसाद यांनी यूट्यूबर गौरव वासवान याच्या विरुध्द तक्रार केली. तक्रारीनंतर गौरवविरोधात दिल्ली पोलिसांनी अखेर ४२० चा खटला दाखल केला आहे. 

कांता प्रसाद यांनी मदतीच्या रुपात 20 लाख रुपये आल्याचा दावा केलाय. पण, गौरवने पैशांमध्ये अफरातफर केल्याने सर्व पैशे मिळू न शकल्याचे ते म्हणाले आहेत. दुसरीकडे गौरव वासवानने कांता प्रसाद खोटो आरोप करत असल्याचे म्हटलं होते. माझ्या खात्यात जे पैसे आले ते मी त्यांना दिले आहेत. ज्यामध्ये 2 लाख 33 हजार रुपयांचा चेक, 1 लाखाची एनइएफटी आणि 45 हजार पेटीएमच्या पैशांचा समावेश असल्याचे त्याने म्हटलं होते. मी स्वत: त्यांच्यासोबत पैसे बँकेत भरण्यासाठी गेलो होते, असंही वासवान म्हणाला होता. 

अभिमानास्पद! यूएनमध्ये महत्वाच्या समितीवर भारतीयाची नियुक्ती

काही दिवसांपुर्वीच 80 वर्षीय प्रसाद यांचा लॉकडाऊनकाळात व्यवसाय होत नसल्यामुळे त्यांचा दुखी झालेला चेहरा आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊन ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर त्यांच्या लहानशा हॉटेलमध्ये ग्राहकांची एकच गर्दी झाली होती. यूट्यूबर गौरव वासवानने कांता प्रसाद यांचा व्हिडिओ केला होता, त्यात प्रसाद यांनी त्यांचा संघर्ष तसेच कोरोनामुळे कमी झालेले ग्राहकसंख्या यामुळे काहीच कमाई होत नसल्याचे सांगितले होते. यानंतर नेटकऱ्यांनी याला मोठ्या प्रमाणात पसरवत बाबा का ढाबा मोठा प्रसिद्ध केला. त्यामुळे देशभरातून कांता प्रसाद यांना पैशांची मदत केली गेली. 

पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव वासन याने केलेल्या प्रसाद यांच्या शेअर व्हिडिओत त्याने प्रसाद यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. पैसे पाठवण्यासाठी गौरवने त्याचे जवळच्या व्यक्तींचे बॅंक डिटेल्स दिले होते, ज्यावर मदत म्हणून मोठ्या प्रमाणात पैसे पाठवण्यात आले आहेत. तक्रारीत प्रसाद यांनी गौरवने अनेक पैशांचे व्यवहार परस्पर केले आणि ते लपविले असाही आरोप केला आहे. या प्रकरणी मालवीय नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT